पारोळा येथे अवैध बॅनर्स होर्डींग्सवर कारवाई

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा शहरातील अवैध  (विना परवानगी) बॅनर्स व होर्डींग्स पारोळा नगर पालिकेच्या वतीने काढण्यात आले.   जिल्हाधिकारी तसेच जिल्हापोलिस अधिक्षक यांच्या निर्देशानुसार आगामी सण उत्सव व होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर न. पा. क्षेत्रात कुठेही  विना परवानगी  कोणतेही छोटे- मोठे बॅनर्स होर्डींग्स लावण्यास बंदी करण्यात आली असुन जिल्ह्यातील सर्व नगर पालिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

याची अमंलबजावणी करित शहरातील विविध भागातील जसे रथ चौक, गाव होळी चौक, न. पा. चौक, बसस्टॅण्ड, शाळा क्र १,  अमळनेर रस्त्यावरिल सर्व लहान मोठे बॅनर्स होर्डींग्स नगर पालिकेच्या वतीने हटवण्यात आले.  तसेच पारोळा पोलिस स्टेशनकडुन शहरातील प्रिंटिंग प्रेस असलेल्यांची  पारोळा पोलिस निरिक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन विशेष सुचना देण्यात आल्या. यावेळी प्रेस वाल्याना विनापरवानगी बॅनर्स पोस्टर न छापण्याच्या सुचना करण्यात आल्या.  परवानगी असलेल्या होर्डींग वर न. पा. च्या वतीने किती दिवसाची परवानगी आहे,  वैगरे हे नमुद करण्याचे सांगण्यात आले.

यापुढे परवानगी शिवाय बॅनर्स नाहीच – मुख्यधिकारी ज्योती भगत

यापुढे शहरात कुठेही लहान मोठे कोणतेही बॅनर्स होर्डींग्स लावण्यासाठी पारोळा नगर पालिकेची परवानगी असने बंधन कारक  करण्यात आला आहे. यासाठी शहरात जनजागृती करण्यासाठी शहरात रिक्षावरून लाॅऊडस्पिकर लावून, वृतपत्राच्या माध्यमातुन तसेच शहरातील विविध सोशल गृप वरून नागरिकांना  जागृत करण्यात आले आहे. याबद्दल नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन न. पा. च्या वतीने करण्यात आले आहे.  तर या पुढे विनापरवानगी कोणते ही लहान मोठे बॅनर्स होर्डींग्स लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पारोळा मुख्याधिकारी ज्योती भगत (पाटील) यांनी दैनिक लोकशाहीशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.