तरुणाची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील शनीपेठ भागातील  दिनकर नगरातील मोहन टॉकीज जवळ वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार त्याच्या पत्नीच्या लक्षात आला.

नरेश ऊर्फ बाळा रवींद्र सपकाळे (वय २८) असे मयताचे नाव आहे.  मयताचे मावस भाऊ नगरसेवक किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर नगरातील मोहन टॉकीजजवळ नरेश ऊर्फ बाळा रवींद्र सपकाळे हा तरुण परिवारासह राहतो. त्याचे स्वतःचे ट्रॅक्‍टर असून तो त्या ठिकाणीच काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह भागवतो. रविवारीच त्याचा पगार झालेला होता.

रात्री नेहमीप्रमाणे जेवण केल्यानंतर घराशेजारी असलेल्या पार्टिशनच्या खोलीत झोपायला गेला होता. सकाळी पाच वाजेच्या सुमारास पत्नी लक्ष्मी यांनी उठून पाहिले असता नरेश याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.