आरोग्य विभागाची परीक्षा आता ‘या’ तारखेला होणार; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र आरोग्य विभागाने स्थगित  केलेली पदभरतीची परीक्षा कधी घेतली जाणार, याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ही परीक्षा 15-16 ऑक्टोबर किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊन विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली जाणार आहे. आयत्या वेळी झाला होता गोंधळ महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत घेतली जाणारी गट क आणि गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा आदल्या दिवशी करण्यात आली.

ही घोषणा होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी घरातून बाहेर पडले होते, काही विद्यार्थी पोहोचले होते तर काहीजण प्रवासात होते. आयत्या वेळी परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अनेकांच्या वेळेचं आणि पैशांचंही नुकसान झालं होतं. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत लवकरच नवी तारीख जाहीर करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं.

जर आणि तर आरोग्यमंत्र्यांनी सध्या दोन वेगवेगळ्या तारखांच्या शक्यता व्यक्त केल्या आहेत. 15 आणि 16 तारखेला रेल्वेची पूर्वनियोजित परीक्षा आहे. ही परीक्षा पुढे ढकलून आरोग्य विभागाची परीक्षा प्राधान्याने घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे पुन्हा या परीक्षेची तारीख जर-तर वर अवलंबून असल्याचं चित्र आहे.

जर रेल्वेची परीक्षा पुढे ढकलता आली, तर 15-16 तारखेला आरोग्य विभागाची परीक्षा होईल. जर रेल्वेची परीक्षा पुढं ढकलणं शक्य झालं नाही, तर मात्र 22-23 तारखेला परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.  NYSA कंपनीचा घोळ ही परीक्षा घेण्याचं काम सरकारनं न्यासा कंपनीला दिलं आहे. मात्र या कंपनीचा पूर्वइतिहास वादग्रस्त आहे. यापूर्वी अनेक घोळ घातलेल्या या कंपनीला महाराष्ट्र सरकारनं आरोग्य विभागाच्या परीक्षांचं काम दिलं होतं. शिवाय त्यातील गोंधळाबद्दल यापूर्वी कुठलीही कारवाई केली नव्हती. त्याचा नाहक ताप वारंवार विद्यार्थ्यांना सहन करावा लागला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.