अशोक लाडवंजारींची भाषा त्यांच्या अंगाशी येईल; ‘त्या’ पत्राला भाजपचे प्रत्युत्तर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजपमध्ये खंबीर नेतृत्व उरलेल नाही, माजी मंत्री खडसेवर टीका करणाऱ्या आमदार गिरीश भाऊ महाजनांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा राष्ट्रवादीचे अशोक लाडवंजारी यांनी दिला आहे. लाडवंजारी यांना जे नाव मिळाले आहे. ते भाजप व भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मेहनत आणि दिवंगत ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रभावाचे फळ आहे. आमदार गिरीश महाजन यांचे सेवा कार्य, कार्य कर्तुत्व, प्रतिमा, लोकप्रियता लाडवंजारी यांनी आजमावू नये. हे म्हणजे हिमालया समोर टेकडीने वल्गना करण्याचा हास्यास्पद प्रकार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार महाजनांना त्यांची जागा दाखवून देऊ ही त्यांची भाषा त्यांच्या अंगाशी येईल हे लक्षात घ्यावे. जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेत लाचाराना हाताशी धरून बदमाशी करणे, आणि तुल्यबळ उमेदवारांचे अर्ज बाद करणे, पक्षपात करणे, मतदारांना घरोघरी पैसे पाठवत विकत घेण्याचा प्रयत्न करणे हे लपून राहिलेले नाही.

रावेर मतदार संघात जाहीर माघारीच्या महागड्या जाहिरात प्रसिद्ध करून महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराला पराभूत करणे, पहिल्या तीनमध्ये बाद करून घेणे यामागची कारणे शोधत आपल्या कथित नेत्यांना जाब विचारण्याची हिमंत लाडवंजारी व अन्य कोणी दाखवतील का असेही असे आमचे आव्हान आहे. गटबाजीने सध्याचे पद मिळवलेल्या लाडवंजारी यांनी अशी हिम्मत दाखवा.

आमचे सहकारी व पक्ष विचार तत्व,मूल्यांची प्रताडना करून केवळ राजकीय स्वार्थासाठी पक्षांतर करणारे अशोक लाडवंजारी यांचे बेकार/नासमज वक्तव्य वक्तव्याबाबतची भूमिका मांडणारे पत्र भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक प्रभाकर सुर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.