अनिल देशमुखांची ईडी कोठडी वाढवली

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांना सुनावण्यात आलेली कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकीलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन्ही बाजुंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने अनिल देशमुख यांना तीन दिवसांची ईडी कोठडी म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

यावेळी ईडीच्या वकीलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस ईडी कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची एकत्रित चौकशी करायची आहे त्यामुळे ईडीने कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.

तर मला आता ईडी कोठडी देऊ नका अशी विनंती अनिल देशमुख यांनी न्यायालयाला केली. अनिल देशमुखांनी म्हटलं, माझा 25 जूनला जबाब नोंदवला गेला. धाडी टाकल्या त्या दरम्यान देखील माझी चौकशी केली गेली. मी स्वतःहून इडी चौकशीला आलो. अटक होण्याआधीपर्यंत मी या प्रकरणात आरोपी नव्हतो. आता 10 दिवस माझी कोठडी झालीये. मला खूप प्रश्न विचारले गेलेत. इतकी वेळ माझी चौकशी केली गेली तरीही मी चौकशीला सहकार्य करत नाही असं खोटं सांगितलं जातंय. असं देखील देशमुख म्हणाले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.