फैजपूर येथे युवारंग महोत्सवाचे थाटात उद्घाटन…

0

 

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनाजी नाना चौधरी महाविद्यालय फैझपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22व्या युवारंग महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. यंदाचा युवारंग धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात चौथ्यांदा आयोजित करण्यात आला आहे.

युवरांगाचे उद्घाटन प्रसिद्ध सिने व नाट्य कलावंत ओंकार भोजने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी, स्वागताध्यक्ष आ. शिरीष चौधरी,  प्रमुख पाहुणे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण, प्रज्ञावंत डॉ. नंदकुमार बेंडाळे, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष राजू नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रवींद्र पाटील, सुनील कुलकर्णी, समन्वयक डॉ. एस व्ही जाधव, सहसमन्वयक डॉ. राकेश तळेले, युवारंग महोत्सव सदस्य प्रा. स्वप्नाली महाजन, अमोल पाटील, सुरेखा पालवे, नेहा जोशी, डॉ. सुनील पवार, डॉ. पी डी पाटील, प्रा. अनिल पाटील, प्रा.एकनाथ नेहते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्घाटन समारंभासाठी पाहुणे कलाकार म्हणून उपस्थित असलेले मराठी सिने अभिनेते ओंकार भोजने यांनी सहभागी कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, युवकांसाठी अभिनय आणि कलासृष्टीत पदार्पण करत असताना संघर्ष करण्याची तयारी आणि त्यासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कला विश्वात वावरत असताना आपले व्यक्तिगत जीवन हे समाजाची संपत्ती असते, म्हणून नितीमुल्यांच्या माध्यमातून तिचे संरक्षण करणे ही एका कलाकाराची जबाबदारी आहे. असे उपस्थित कलाकारांना आवाहन केले. कलाक्षेत्रात युवरांगतील सर्व कलावंतांचे स्वागत आहे भविष्यात तुम्हीही माझ्यापेक्षा मोठे कलाकार व्हा अश्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

कुलगुरू डॉ.व्ही एल माहेश्वरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात युवक महोत्सव म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक जीवनाची सांगड घालणारा एक रंगीत महोत्सव या रंगीत महोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी आपल्या प्रतिभांना कलागुणांना जगासमोर सादर करावे आणि एक यशस्वी कलाकार म्हणून समाजात नावलौकिक मिळवावे असे सांगितले. तसेच आयोजनाविषयी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर आणि विद्यापीठातील समितीच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.