आ. खडसेंनी केली इच्छादेवी ते डीमार्ट रस्त्याची पहाणी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत मा.मंत्री एकनाथराव खडसेंनी मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलेच वेठीस धरल होत.

त्याच अनुषंगाने आज शुक्रवार दि.10 फेब्रुवारी 2023 रोजी खडसेंनी सध्या काम चालु असलेल्या इच्छादेवी ते डीमार्ट रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी करत रस्त्याचे मोजमाप केले असता, एका बाजुच्या रस्त्याच्या मध्यभागातुन कडेपर्यंत डीमार्ट जवळ 8.10 मीटर, तर काही ठीकाणी 7, 7.5 मीटर एवढीच रुंदी असुन कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले.

मंजुर टेंडर नुसार सदरील रस्त्याची एका बाजुची रुंदी ही 10.15 मीटर एवढी असुन प्रशासनातील अधिकारी कोणाच हित साधण्यासाठी असे रस्ते जळगावकरांच्या माथी मारत आहात? प्रशासन गाफील राहुन केवळ बघ्याची भुमिका कशाकरता घेत आहेत? अशा प्रश्नांची सरबत्ती करत पीडब्ल्युडी चे अधिक्षक अभियंता प्रशांत सोणवने, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्याशी दुरध्वनी व्दारे चर्चा केली.

सदरील पहाणी दरम्यान पीडब्ल्युडी चे उपविभागीय अभियंता सुर्यवंशी यांना देखील सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे असुन रस्त्याचे मोजमाप करुन दाखवुन त्याची शहानीशा करुन दिली व त्यांनी देखील सदरील बाब मान्य केली व तात्काळ यावर कारवाई करण्यात येईल व अतिक्रमण काढुनच दोन्ही बाजुने समांतर रस्ते करु असे आश्वासन एकनाथराव खडसे यांना दिले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, मा.नगरसेवक राजु मोरे, मा.नगरसेवक रवी पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रीकु चौधरी, कार्याध्यक्ष सुशिल शिंदे, महानगर उपाध्यक्ष किरण राजपुत, रफीक पटेल, रहिम तडवी, राहुल टोके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.