धक्कादायक; मैत्रिणीच्या मृतदेहाजवळच इमारतीवरून उडी घेत तरुणीची आत्महत्या…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मैत्री बद्दल आपण सर्वांनीच अनेकवेळा चित्रपटांतून पहिले आहे. मैत्रीसाठी जीव देणे-घेणे किंवा काहीही करून जाने या अश्या भरमसाट असंख्य संवाद देखील आपण ऐकत आलो आहोत. मात्र प्रत्यक्षात मैत्रीसाठी किंवा मित्रांसाठी जीव ओवाळून टाकणारे फार क्वचित आहेत. अश्याच एका मैत्रिणींच्या घट्ट नात्याने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणून सोडले आहे. आपल्या बालमैत्रीणीची आत्महत्या जिव्हारी येऊन एका तरुणीने स्वतः देखील आत्महत्या केली आहे.

पुणे येथील हडपसरमधील शेवाळवाडी येथे धक्कादायक घटना घडली आहे. बाल मैत्रिणीने आपल्या घरात साडीच्या सहाय्याने आत्महत्या केली, तिच्या मृतदेहाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसमोरच दुसऱ्या तरुणीनेही पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

सानिका हरिश्चंद्र भागवत (१९) व आकांक्षा औदुंबर गायकवाड (१९) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावे असून वरील धक्कादायक प्रकार शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

हडपसर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा भागवत व सारिका गायकवाड या दोघी बालपणीच्या मैत्रिणी होत्या. सात वाजेच्या सुमारास सारिकाने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले होते.

सारिकाचा मृतदेह पोलिस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात असतानाच, आकांक्षाने पाहिलं व तिने त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला. पाचव्या मजल्यावरन उडी घेतली व ती रुग्णवाहिकेजवळ पडली. उंचीवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेला आकाक्षांचा देखील मृत्यू झाला.

अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून, या दोघी मैत्रींणीनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समजलेलं नाही. दरम्यान, पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.