रावेर-जळगाव बसला कंटेनरची धडक

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रावेर-जळगाव बसला कंटेनरने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील दोन प्रवासी जखमी झाले. तर सुदैवाने १८ प्रवाशांना काहीही दुखापत झाली नाही. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. हा अपघात मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास रावेर शहरापासून तीन कि.मी. अंतरावर झाला.

जळगाव आगाराची रावेर-जळगाव एमएच ४o एन ९८३४ या क्रमांकाची बस मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता रावेर येथून जळगावकडे रवाना झाली. त्याचवेळी सावद्याकडून येणारा डीडी ०३ एम ९४३२ या क्रमांकाचा ट्रक कंटेनरने बसला धडक दिली. त्यात बसमधील दोन प्रवासी खिडकीच्या तुटलेल्या काचा लागल्याने जखमी झाले. या अपघातानंतर बस थेट शेतात घुसली. बसच्या पुढील काचा, खिडक्यांचे काच तुटून पत्र्याचेही नुकसान झाले आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस भागवत धांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पाठवून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी रावेर पाेलिसांत नाेंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.