ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण शेतकरी ठार ; पाचोरा तालुक्यातील दुर्दैवी घटना

0

पाचोरा ;- जळगांव ते पाचोरा महामार्गावर ट्रॅक्टरने धडक दिल्याने खेडगाव (नंदिचे) येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. संबंधित शेतकरी हे हायवे क्रास करत असतांना ट्रॅक्टरने धडक दिल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदिचे) येथील अर्जुन आनंदा फरगाडे (वय – ४२) हे ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतातुन पायी घरी येत असतांना जळगाव ते पाचोरा रस्त्यावर हाॅटेल पांडुरंग समोर ट्रॅक्टरने आनंदा फरगाडे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत आनंदा फरगाडे हे गंभीर जखमी झाल्याने रुग्णवाहिका चालक भागवत पाटील यांच्या मदतीने त्यांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संबंधित ट्रॅक्टर हे पाचोरा येथील सोनाई गृपचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. घटने प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत अपघातीची नोंद करण्याचे काम सुरू होते‌. मयत आनंदा फरगाडे यांचे पाश्चात्य आई, पत्नी, दोन मुले, असा परिवार असुन घराच कर्ता पुरुष गेल्याने फरगाडे कुटुंबियावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.