देवझाड वनपरिसरात अवैध हातभट्टी दारू उद्धवस्थ ; यावल वनविभागाची कारवाई

0

यावल ;- चोपडा तालुक्यातील वैजापूर वनक्षेत्रात अवैधरित्या सुरु असलेल्या हातभट्टीचे दारु अड्डे यावल वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. याठिकाणाहून सुमारे अडीच लाख किमतीची अडीच हजार लिटर हातभट्टीची दारू सात हजार रुपये किमतीचे ३५ बॅरल असा दोन लाख ५२ हजार रुपयांच्या मुद्देमाल वन विभागाने जप्त करत जागेवरच नष्ट केला. यामुळे खळबळ उडाली आहे.

यावल वनविभाग अंतर्गत असलेल्या चोपडा तालुक्यातील वैजापूर वनक्षेत्रातील खाऱ्या- पाडाव परिमंडळात देवझाड वनपरिसरात अवैध हातभट्टीची दारू साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार धुळे वनविभागाचे वनसंरक्षक नीनू सोमराज, उपवन संरक्षक जमीर शेख, विभागीय दक्षता अधिकारी राजेंद्र सदगीर, सहाय्यक वन संरक्षक प्रथमेश हाडपे, यांचे मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली .

वैजापूर वनक्षेत्रपाल एस. एम. सोनवणे, चोपडा ग्रामीण पोलीस पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, वनपाल खलील याकुब शेख, अश्विनी धात्रक, अर्चना गवते, आय.एस. तडवी, सी.आर. कोळी, वंदना बारेला, संदीप ठाकरे, लोकेश बारेला, हुकाऱ्या बारेला, हेमलता बारेला, सुनील भोई, संदीप भोई, भारसिंग बारेला, विजय शिरसाट, बाजीराव बारेला, ज्योती बारेला, धनाबाई बारेला, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पारधी, लोटन सोनवणे, प्रताप कोकणी, सुशील कोळी, भागवत पाटील, निवृत्ती पाटील, निखिल पाटील असे सुमारे ४० जणांच्या वन विभागाच्या पथकाने सुमारे दोन लाख ५२ हजार रुपयाची अवैध हातभट्टीची दारूसह, रसायन व साहित्य जागेवर नष्ट केले आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.