महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

शिवसेना ठाकरे गट - 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - 10 जागांवर लढणार

0

मुंबई ;- महाविकास आघाडीचा राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप जाहीर झालं. महाविकास आघाडीत ठाकरे गट 21, शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. यात भिवंडीची जागा शरद पवार गटच लढणार आहे. तर सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीची शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, संजय राऊत आदी उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गट – 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 10 जागांवर लढणार असल्याचे जाहीर केले. महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी बाहेर पडले आहेत. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हेच प्रमुख तीन पक्ष या आघाडीत असण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या जागा (17)

नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि मुंबई उत्तर.
राष्ट्रवादी (10)

बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड.
शिवसेना (21)

जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य.

Leave A Reply

Your email address will not be published.