मोहरला ते कोरपावली रस्त्यावर अवैधरित्या लाकडांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

0

यावल वनविभागाची कारवाई ; एकाला अटक

यावल ;- उपवनसंरक्षक , यावल वनविभाग जमीर शेख यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून १७ रोजी ३ ते ५ वाजेचे सुमारास मोहरला ते कोरपावली रस्त्याने दबा धरुन् बसले असताना ट्रॅक्टर क्रमांक. (MH 19-BG 6210) मध्ये अवैध् लाकूड भरलेले दिसले. वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही. प्रथदर्शनी हा वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशी साठी ताब्यात घेऊन शासकीय आगार यावल येथे आणून जमा केला असून याप्रकरणी चालकाला ताब्यात घेतले आहे.

अंजन, निम इमारती लाकूड अंदाजे नग 18. घ.मी. – 2.670 किंमत रुपये 29,508 व .ट्रॅक्टर क्रमांक MH 19 BG 6210 जप्त करण्यात आले आहे. या गुन्हे प्रकरणी वन रक्षक हरिपुरा यांनी वाहन चालक _खलील रफिक तडवी रा. कोरपावली ता. यावल जि. जळगाव। यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2)ब, 42, 52 अन्वये. गुन्हा नोंदविला आहे. या कार्यवाहीत वनक्षेत्रपाल यावल पश्चीम व् कर्मचारी तसेच् वनक्षेत्रपाल यावल पुर्व् व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

सदर कार्यवाही ही . जमीर शेख, उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव , प्रथमेश हाडपे म. सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल, यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल यावल प.. सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल यावल पुर्व स्वप्नील फटांगरे यांनी व त्यांचे पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

वनक्षेत्रपाल यावलं पश्चीम( प्रा.) यावल वनविभाग जळगाव वन व वन्यजीव तसेच लाकूड वाहतूकसंबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.