सोने-चांदीच्या दरात मोठा बदल, पहा आजचे भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दराने विक्रम मोडला होता. त्यातच लगीनसराई असल्याने सोने चांदीची खरेदी वाढली आहे. मात्र  आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठा बदल झालाय.

सोन्याच्या किमतीत घट झाली असून आज 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 400 रुपयांनी घसरले आहेत. दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 66,020 रुपये आहे. चेन्नईमध्ये सोन्याचा सर्वाधिक दर 66,440 रुपये आहे. सोन्याची सर्वाधिक किंमत चेन्नईमध्ये आहे. एक किलो चांदीची किंमत 77,000 रुपये आहे.

जळगाव शहरातील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा जळगावमधील सोन्याचा भाव 65,630  आहे. तर चांदीचा भाव 75,520 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.