यावल-;- यावल येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक म्हणुन कार्यरत असलेले राकेश मानगावकर यांची दहिगाव दंगलीच्या पार्श्वभुमीवर जळगाव येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर पोलीस निरिक्षक म्हणुन प्रदीप ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनीयावल पोलीस ठाण्याची पदाची सुत्रे स्विकारली आहे.
पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर हे मुळ धुळे येथील रहीवाशी असुन, ठाकूर हे तिवसा जिल्हा अमरावती या ग्रामीण क्षेत्रात सेवा कार्यरत होते. पोलीस निरिक्षक ठाकूर हे जळगाव जिल्ह्याशी परिचित असुन या आदी त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाणे, एमआयडीसी स्थानक, जिल्हा पेठ, पारोळा येथे विशेष सुरक्षा विभागात देखील त्यांनी सेवा बजावली असून जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात देखील त्यांनी सेवा बजावली आहे.