जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा कारागृहात कार्यक्रम

0

जळगाव ;- जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा कारागृहाकरीता महिला विभागासाठी आणखी एक नवीन बॅरेक व एक बॅरेक तृतीय पंथि बंदिसाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून उभे करण्यात आले. त्याचे उदघाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रिद वाक्य “सुधारणा व पुनर्वसन” अंतर्गत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अभिताभ गुप्ता,यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधारसेवा डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या प्रेरणेने, तसेच उपमहानिरीक्षक मध्य विभाग कारागृह छत्रपती संभाजीनगर यु.टी. पवार यांच्या प्रयत्नाने “जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ०८ मार्च २०२४” रोजी जळगांव जिल्हा कारागृहाकरीता महिला विभागातील नवीन बॅरेकचे उद्घाटन ठेवण्यात आले होते.

‘जागतिक महिला दिनादिनामित्त आयोजित कार्यक्रमाचे न्यायाधीश, सत्र न्यायालय, जळगाव श्रीमती. जान्हवी केळकर,यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. . यावेळी कारागृहात उत्कृष्ट काम करणारे कारागृह अधिकारी, कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त जळगांव जिल्हा कारागृह अधिक्षक अनिल वांढेकर, वरिष्ठ अधिकारी गजानन विठ्ठल पाटील, तुरुंगाधिकारी (श्रेणी-२) स.पी.कवार, तुरुंगाधिकारी (श्रेणी-२) आर.ओ. देवरे व इतर सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.