सलमान खानला Y+ सुरक्षा, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर देण्यात आली सुरक्षा…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

बॉलीवूडचा (Bollywood) सुपरस्टार सलमान खानची (Superstar Salman Khan) सुरक्षा लक्षात घेऊन त्याची सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सलमानला आता Y+ श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. (Salman has now been granted Y+ category security) लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे कथित लॉरेन्स बिश्नोईचा हात होता. काही दिवसांपूर्वी सलमानच्या कुटुंबीयांनाही धमकीचे पत्र आले होते.

या वर्षी 29 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. ज्यामध्ये सलमानचे हाल पण सिद्धू मूसवाला प्रमाणे करेल असे लिहिले होते. पोलिसांनी बिष्णोई टोळीच्या अनेक गुंडांना अटक केली, ज्यांनी सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. त्यामुळे अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.