Saturday, January 28, 2023

बसस्थानकातून 50 हजारांची रोकड लंपास

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन वृद्धाच्या कापडी पिशवीतून  50 हजार रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिताराम शंकर धनगर (वय ७५, रा. हिंगोणा ता. अमळनेर) हे शेतकरी असून आपला कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी खात्यावर पीक कर्जाची अनुदान शासनाकडून मिळाले, मिळालेल्या अनुदानाची रक्कम काढण्यासाठी ते गेले. बँकेतून पैसे काढून पुन्हा अमळनेर बसस्थानकात आले. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कापडी पिशवीत ठेवलेले ५० हजार रुपयाची रोकड लंपास केली.

- Advertisement -

दरम्यान चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर सिताराम धनगर यांनी तातडीने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक सुनील महाजन करीत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे