‘गुरुवर पू. चांदमलजी महाराजांचा महिमा अपरंपार’ – पू. पार्श्वचंद्रजी म.सा.

0

प्रवचन सारांश – 1.11.2022 

गुरुवर पू. चांदमलजी महाराज साहेबांचा महिमा अपरंपार आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण येणारी पिढी कायम करणार आहे. त्यांनी धार्मिक ग्रंथ लिहिले, त्यांच्या ओघवत्या वाणीचे प्रवचन आणि त्यांनी केलेले गायन ह्या सगळ्या गोष्टी केवळ अवर्णनीय अशाच आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतिंना आपण सर्व स्मरण करू या असे आचार्य श्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. यांनी आवाहन केले.

या जगात कुणीही कुणाचे नाही, कुणीही आपले नाही. माझा आत्मा हाच माझा खरा साथीदार आहे. दुःखाला घाबरायचे नाही याबाबतची प्रेरणा ‘मेरी भावना’ रचनेतील ओळींचा अर्थ प्रवचनात समजावून सांगण्यात येत आहे. पू. डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर म.सा. यांनी आपल्या प्रवचनात अंजना आणि पवनकुमार यांची सुरू असलेली कथा पुढे सांगितली. अंजना व तिची मैत्रिण वसंतमाला यांना कुणीही नगरात मदत देऊ नये, सहारा देऊ नये. त्यांना नगरातून बहिष्कृत केलेले आहे. असा राजआदेश असल्याने कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही. भरते दिवस असल्याने आपण आपल्या माहेरी महेंद्रपुरी येथे जावे असा विचार करून दोघीही महेंद्रपुरी येथे पोहोचल्या परंतु त्यांना त्या ठिकाणीही कोणीच मदत केली नाही.

वडील, आई आणि भाऊ कुणीच अंजनाला सहारा दिला नाही. शेवटी अंजनाने जंगलात शरण घेण्याचे ठरविले व त्या दोन्ही मैत्रिणी जंगलात पोहोचल्या. एका साधक ब्राह्मणाने त्यांना अन्न-पाणी दिले. अनवाणी पायांनी अंजना चालत होती. नारी ही संकटावर मात करत असते म्हणूनच तिला, ‘नारी जो कभी ना हारी !’ म्हटले जाते. नारी ही अबला समजली जाते परंतु अंजना सारख्या ध्यैर्यवान नारी होऊन गेल्या. अंजना तर सबला म्हणायला हवी. जंगला ज्ञानसंपन्न मुनिराज त्यांना भेटतात अंजनाला ते उपदेश करतात. तिच्यावर या जन्मी असे संकटे का आली याबाबत ते तिच्या पूर्वजन्माचे कर्म सांगतात. कर्म भले ते पूर्व जन्माचे असो वा ह्या जन्माचे त्याचे फळ हे भोगावेच लागतात. कर्म व सुख-दुःख यांचा अगदी जवळचा संबंध असल्याचे डॉ. पदमचंद्र महाराज यांचे सुशिष्य जयपुरंदर म.सा. यांनी ‘मेरी भावना’ प्रवचन मालेत सांगितले.

जळगाव येथील आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदी ठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये दैनंदिन प्रवचनाचा लाभ श्रावक-श्राविका घेत आहेत.

पूज्य श्री चांदमलजी महाराज साहेब यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने आचार्य श्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘गुरुंशिवाय जीवन सुरू होत नाही!’ असे म्हटले जाते. पू. चांदमलजी महाराज साहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याबाबत आठवणींना उजाळा दिला गेला. पू. चांदमलजी महाराजांमध्ये अपार ऊर्जा होती. पहाटे 3 वाजता उठून ते स्वाध्याय करत असत. एकासना, धर्म आराधना ते करत असत. धर्म-ध्यानात ते मग्न असत. त्यांची पू. नथमलजी महाराज यांच्यावर अपार श्रद्धा होती.

पू. चांदमलजी महाराजांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने धर्म आराधना, उपवास, दया आणि एकासना करण्याचे आवाहन पू. पार्श्वचंद्रजी म.सा. यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रावक-श्राविकांनी ऐकासना, धर्मआराधना मोठ्या संख्येने हिरीरीने केली.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.