Saturday, January 28, 2023

लंपी आजाराने लोहारा येथील तरण्याबांड खिलार बैलाचा मृत्यू

- Advertisement -

लोहारा ता. पाचोरा ( ज्ञानेश्वर राजपूत), लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोहारा पशुवैद्यकीय केंद्र हे (क) श्रेणीचे असून  नियुक्त कर्मचाऱ्यांनी लोहारा गावासह केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये लसीकरण केलेले आहे. येथे काही वर्षापासून पदसिद्ध वैद्यकीय अधिकारी नाही, यामुळे प्रभारीराव कडुनच येथील सूत्र हलवले जाते. शेतीबरोबर काही शासकीय योजना किंवा पशु हल्ला अशा काही घटना घडल्या तर नियुक्त कर्मचाऱ्यांना याला फोन लाव, त्याला फोन लाव या समुपदेशनापलीकडे पर्याय नाही यावर जिल्हा आरोग्य विभाग किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी सोबतच प्रथमतः लोकप्रतिनिधींचा अंकुश दिसून येत नाही किंवा हेतू पुरस्कर दुर्लक्ष दिले जात नसावे, यामुळे पशुपालकांना गर्भगळीत होऊन नाद सोडण्यापलीकडे काही उरत नाही.

पशुंवर अज्ञात लंपी आजाराने सध्या विळखा  घातलेला आहे. लोहारा येथे लंपी आजाराबाबत लसीकरण झालेले असताना बाधित पशूंच्या संख्येत वाढ होताना दिसून येते तर काही उपचार सुरू असतानाही गुर दगायला लागली आहेत अशी घटना समोर आलीय.  लोहारा येथे निलेश कैलास धनगर या पशुपालकाचा पाच वर्षे वयाचा तरणाबांड खिलार जातीचा दहा-बारा दिवसापासून उपचार सुरू असतानाही काळा बैल (गोर्हा) दगावला. या बैलाची किंमत आज बाजारभावप्रमाणे  ६० हजार रुपये तर खाजगी औषधीचा खर्च १५ हजार रुपये झालेला असून पशुपालकाचे ७५ हजार रुपयांचे नुकसान या अज्ञात आजाराच्या साखळीत पशु मयत झाल्याने झाले.

- Advertisement -

शर्यतीसाठी वापरला जाईल असा बैल असल्याने मोठी किंमत येईल अशा अपेक्षेने कुटुंबीयांनी वाढवलेला होता. आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून कुटुंबीयांनी त्याला शेतातच ठेवण्याची काळजी घेतलेली होती. पण हा बैल दि. १ नोव्हेंबर मंगळवार आज सकाळी आठ वाजता मरण पावला. आर्थिक नुकसान होऊ द्या पण जिव्हाळ्याने वाढवलेला बैल डोळ्यासमोर मरण पावल्याने कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. लम्पि आजाराबाबत संबंधित विभागाने पारदर्शकपणे लक्ष ठेवून पशुपालकांना मार्गदर्शन करावे व औषधीही उपलब्ध करून द्यायला हवी. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे, अनेक वेळा बाधित पशु मुक्तपणे फिरताना दिसून येत आहे. अशा पशुपालकांना सूचना द्यायला हवी अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे