लाजिरवाणे; महिला अत्याचारात महाराष्ट्र इतक्या क्रमांकावर…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

अहवालानुसार २०२१ मध्ये २०२० पेक्षा अत्याचाराच्या घटनांमध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात बलात्काराच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने अलीकडेच त्यांचा धक्कादायक अहवाल सादर केला आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार, राजस्थानमध्ये देशातील सर्वाधिक अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर लाजिरवाणी बाब म्हणजे महाराष्ट्र महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०२१ मध्ये देशात नोंदवलेल्या एकूण ३१,६७७ बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी ६३३७ राजस्थानमध्ये, तर २८४५ बलात्काराच्या घटना उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आल्या आहे. २०२० मध्ये राजस्थानमध्ये बलात्काराच्या ५३१० नोंदवल्या गेल्या होत्या. २०२१ मध्ये त्यात १९.३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनीही महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर हा गुन्हेगारी वाढण्यामागील एक घटक मानला गेला आहे.
२०२१ मध्ये देशभरात महिलांविरोधातील ४,२८,२७८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये ५६,०८३ गुन्हे नोंद झाले आहेत, तर राजस्थानमध्ये ४०,७३८ गुन्हे नोंद झाले आहेत. गेल्या वर्षी महिलांवरील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र ३९,५२६ गुन्ह्यांसह तिसऱ्या तर पश्चिम बंगाल ३५,८४४ गुन्ह्यांसह चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात दिली आहे.

राजस्थानमध्ये २०२१ या वर्षात बलात्काराच्या ६३३७ प्रकरणांपैकी ४८८५ प्रकरणांमध्ये प्रौढ पीडितांचा समावेश आहे. तर १४५२ प्रकरणे अल्पवयीन पीडिसांसोबत घडली आहेत. २०२१ मध्ये एकूण १,४९,४०४ मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०२० च्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये १६.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिलांवरील गुन्ह्यांची बहुतांश प्रकरणे पती किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून छळ केल्याप्रकरणी नोंदवली गेली आहेत. त्याखालोखाल अपहरण आणि बलात्कारची प्रकरणे नोंद झाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.