आरोपांनी गाजली डोंगरकठोरा ग्रामसभा…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

तालुक्यातील डोंगरकठोरा येथील विविध कार्यकारी सोसायटी येथे जनरल ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसेवक एम.टी. बगडे यांनी अजेंडा वाचून एमआरजीएस महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना कृती आराखडा व इतर योजनेची माहिती दिली. माजी सदस्य शब्बीर तडवी यांनी सरपंच, ग्रामसेवक यांना मागील बैठकीमध्ये घेतलेल्या समस्या अद्याप सोडवल्या नसल्याचे विचारले असता, आता परत पुढील बैठकीत विचार करू असे सांगितले गेले.

गावात पंधराव्या वित्त योजनेतून झालेल्या कामा बद्दल माहिती विचारली. गातील अनुसूचित जाती जमातीचा निधी कुठे कुठे वापरला? तसेच अनु. जाती वस्तीत गटारी दुरुस्ती व नको तिथे काँक्रीटीकरण करण करण्यात आले. 2 महिन्या पासून अंडर ग्राउंड गटार खोदून ठेवली असून अद्याप पर्यंत तिचे पूर्ण काम केलेले दिसून आले नाही. त्यामुळे तेथील महिलांना रात्री शौचास जाण्यास फार त्रास सहन कराव लागतो. खोदलेल्या खड्यात आदर्श आढाळे हा 17 वर्षाचा मुलगा पडून जखमी झाला त्याच्या पायाला दुखापत झाल्याचीही घटना घडली. ठेकेदार व ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे जीवित हानी होऊ शकते.

सदर अपूर्ण कामाबद्दल महिला विचारण्यासाठी गेल्या असता त्यांना सरपंच, ग्रामसेवक यांनी सांगितले की, आम्ही गटार बघायला येतो आणि महिलांना घरी पाठवून सदर ठिकाणावर पाहणीसाठी ते गेलेच नाही. अश्या कारभारामुळे गावच्या समस्या सुटणार का? आणि गावाचा विकास होईल का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

फक्त टक्केवारी द्या, काम घ्या. अश्या बेजबाबदार ग्रामसेवक, ठेकेदारावर कारवाईच्या मागणीची चर्चा गावात सुरु आहे. तसेच ग्रामसेवक हे वेळेवर येत नाहीत, व्हेटर्नरी डॉक्टर, उपकेंद्राचे डॉक्टर, शिक्षक गावात राहत नाही व वेळेवरही येत नाही, असे ग्रामस्थांनी अनेक विषय मांडले. मागील 4 ते 5 महिन्यापूर्वी बाहेरील संस्थेला महिलांना केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात पूर्णतः अपहार झाल्याचे ग्रामस्थांची तोंडी तक्रार आहे. त्यात एकूण 80 हजार रुपयाचा खर्च दाखविण्यात आला आहे. त्या संदर्भातील माजी सदस्य शब्बीर तडवी यांनी बिल सादर करण्यास सांगितले असता ग्रामसेवक यांनी कोणतेच दप्तर व बिल दाखविले नाही. त्यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सदर बैठकीला सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनंजय पाटील, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, सदस्य दिलीप तायडे, जुम्मा तडवी, आशा आढाळे, डॉ राजेंद्र झांबरे, एश्वर्या कोलते, शकीला तडवी, शबनम तडवी, रोजगार सेवक . डिगंबर खडसे, लुकमान तडवी, मुत्सुफा तडवी, हुसेन तडवी, रमजान तडवी, लालचंद झोपे, क्लर्क प्रदीप पाटील, डालू पाटील, तलाठी वशिम तडवी, समाधान तायडे, भीमराव आढाळे, पांडुरंग धनगर, सुपडू तडवी, कांचन तायडे शंकर वारके, उमाकांत पाटील, चेतन पाटील खेमचंद्र पाटील,शरद धनगर, फिरोज तडवी, प्रवीण मेघे रवींद्र आढाळे इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तर इतर ग्रामपंचायत सदस्य यांची सभेला दांडी होती. सूत्रसंचालन दिलीप तायडे यांनी केले तर आभार ग्रामसेवक एम.टि .बगडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.