वाघूर धरणात दीड वर्ष पुरेल इतका जलसाठा

0

जळगाव : यावर्षी वाघूर परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे वाघुर धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे वाघुर धरणात ७३ टक्के जलसाठा शिल्लक असून जळगाव शहराला दीड वर्ष पुरेल इतका जलसाठा धरणात आहे. त्यामुळे जळगावकरांना सध्या तरी पाणी टंचाईची चिंता नसली तरी, उन्हाळा कडक असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्याप्रमाणात होत असल्यामुळे व जामनेर परिसरातील इरिगेशनला जास्त पाणी लागण्याची शक्यता असल्यामुळे जळगावकरांनी पाण्याची नासाळी न करता पाणीजपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

वाघूर धरणात ७३.४७ टक्के पाणीसाठा असून, दी वर्षे टंचाईहोणार नाही, याचा दिलासा जळगावकरांना मिळाला आहे. जळगाव शहराची लोकसंख्या सुमारे सहा लाख आहे. वाघूर धरणात पाणी आरक्षण ४० दशलक्ष घनमीटर इतके आहे. शहरास दररोज ९० एमएलडीइतका पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा दीड वर्षे पुरेल एवढा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.