बळीराम पेठ  येथे पाडवा ते रामनवमी राम कथासार व प्रवचन

0

श्री साई सेवा मंडळचा उपक्रम

जळगाव ;- धुळे येथील निलाताई रानडे यांच्या अमोघ वाणीतून पाडवा ते रामनवमी हा प्रवचनाचा कार्यक्रम दिनांक : ९ एप्रिल २०२४ ते १७ एप्रिल २०२४ या दरम्यान श्री साई सेवा मंडळ, बळीराम पेठ, जळगांव तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. सायंकाळी ५ ते ७ यावेळेत साईबाबा मंदीर, क्रान्ती मित्र मंडळ चौक, वीर सावरकर पथ, बळीराम पेठ, जळगांव येथे होणार आहे.

श्रीराम एक आदर्श व्यक्तीमत्व, पुरूषोत्तम, आदर्श पुत्र, बंधु, मित्र, पती, राजा, शासक हे सगळच आपल्यावर आईच्या गर्भात असल्यापासुनच रूजवण्यात आलेला आहे. मात्र श्रीराम हे माणुस म्हणुन जन्माला आले, आणि स्वकर्तुत्वाने “परमेश्वर” झाले. त्यांचा हा ७ ते ८ हजार वर्षांपुर्वीचा प्रवास ऐकण्यासाठी खरं तर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रामायणाचे परवाच ऐकणे हि भाविकांसाठी चांगली पर्वणी राहणार आहे.हे प्रवचन ऐकणे हा अविस्मरणीय अनुभव असेल.

रामायण विषयावर हे प्रवचन आयोजित केले असल्याची माहिती श्री साई सेवा मंडळ आयोजकांतर्फे करण्यात आली असून भाविकांनी प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सतिष खलाणे (अध्यक्ष) 9421521578 आशिष जोग 7020213694 विरेंद्र मोदे 9422224204 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.