जीपीएस ग्रुप यांच्या पुढाकाराने पक्षी प्रेमींना 500 बडगे (मातीची भांडी) वाटप

0

पाळधी/ धरणगाव ;- पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या धडपडीला सुसह्य करुन त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथील GPS ग्रुप मार्फत 500 बडगे (मातीची भांडी) वाटप करण्यात आले. केवळ साहित्य लावले नाही तर त्यामध्ये महिनाभर पाणी व धान्य ठेवण्याची जबाबदारीही तरुणाईने समर्थपणे उचलून पक्ष्यांचे प्राण वाचवावे व पक्ष्यांसाठीच्या जाणिवेचा हा ओलावा आणखी वाढवण्यासाठी साऱ्यांकडूनच बळ मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे आज बाजाराचे औचित्य साधून 500 बडगे वाटप प्रसंगी बोलत होते. उन्हाच्या प्रखर झळांमध्ये पक्ष्यांची जगण्यासाठीची ससेहोलपट थांबवण्यासाठीच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व जीपीएस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रसंगी बडगे कहा वापर कसा करावा यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

पक्ष्यांचा वाचवा जीव
तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली असून, वन्यप्राण्यांसह पशुपक्षी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. त्यांच्या तृष्णातृप्तीसाठी नागरिकांनी आपल्या घराबाहेर, छतावर, संरक्षण भिंतीवर, भिंती तथा वृक्षांवर बडगे (मातीच्या भांड्यात ठेवून) पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी ठेवणे गरजेचे असून प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था राष्ट्रीय कर्तव्य समजून बजावल्यास पक्ष्यांच्या जीवाचे रक्षण करता येईल. तेव्हा प्रत्येकानेच या कार्यात पुढाकार घेवून राष्ट्रीय संपत्ती जोपासण्यासाठी माणुसकीचा वाटा उचलावा असे आवाहन GPS ग्रुप मार्फत करण्यात आले आहे.

या प्रसंगी पाळधीचे सरपंच विजयसिंग पाटील, उपसरपंच राहुल ठाकरे, ग्रा.पं. सदस्यांसह GPS मित्र परिवार चे सर्व सदस्य व पक्षी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.