पाणी काढणे बेतले जीवावर; जळगावात शाळेच्या वाचमनचा बुडून मृत्यू…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शहरातील पिंप्राळा भागात स्थित शाळेच्या वॉचमनचा पाणी भरतांना हौदात पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मुंदडा विद्यालयाचे वाचमन किशोर दत्तात्रय चोधरी (४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ही घटना शुक्रवार १२ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा भागातील मुंदडा विद्यालयाच्या परिसरात किशोर चौधरी हे गेल्या आठ वर्षांपासून पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. ते शाळेत वॉचमन म्हणून काम करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास किशोर हे शाळेच्या आवारात असलेल्या हौदातून पाणी काढण्यासाठी गेले असता त्याचा तोल जावून ते हौदात पडले व त्यांचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरी किशोर हे पाणी घेवून आले नसल्याने ते त्यांना बघण्यासाठी त्यांच्या पत्नी हौदाजवळ गेल्या असता त्यांना आपले पती किशोर है हौदात बुडालेले दिसून आले. ते दृश्य पाहून पत्नीने आरडा-ओरड सुरु केली त्यांच्या आवाजाने परीसरातील नागरीकांनी त्याठिकाणी धाव घेत किशोर चौधरी यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.