जळगाव निवृत्तीनगरात तरुणाची आत्महत्या…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सध्या तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच जळगावातून अजून एक तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आली आहे. शहरात स्थित निवृत्तीनगरात राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि १३ मे रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मात्र आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेमंत राजेंद्र चौधरी (३४) असे मृत तरुणाचे नाव आहे.

घटने बाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहिती वरून, हेमंत चौधरी(34) हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह निवृत्ती नगरात वास्तव्यास होते. ते आपल्या उदरनिर्वाहासाठी पेंटरचे काम करत होते. दरम्य शुक्रवारी १२ मे रोजी रात्री हेमंत चौधरी हे जेवण करून झोपले होते. मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असतांना त्यांनी किचनमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी १३ मे रोजी सकाळी ५ वाजता पत्नी गायत्री यांच्या लक्षात आल्याने त्यांनी एकच आक्रोश केला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. नागरीकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी गायत्री, मुलगा प्रतिक आणि मुलगी माही (८), आई, भाऊ विनोद आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.