व्लादिमीर पुतिन येणार भारतात…?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ज्यांच नाव जरी ओठांवर आले तरी थरकाप होतो, आणि सर्वांनाच ज्ञात असलेले रशिया आणि युक्रेनचे युद्ध. वर्षभरापासून सुरु असलेलं रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia and Ukraine War) संपण्याचं नाव घेत नाही आहे. व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या या भूमिकेमुळं जगभरातील सर्वच देश त्यांच्यावर नाराज आहेत. मात्र, आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) भारतात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहू शकतात, असं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह (Dmitry Peskov) यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

पुतिन भारतातील शिखर परिषदेत सहभागी होणार का? यावर पेस्कोव्ह (Dmitry Peskov) यांनी सांगितलं की, “हे शक्य होऊ शकतं. पण, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही, असं वृत्त रशियन वृत्तसंस्था Tass नं दिलं आहे.G20 मध्ये रशियाचा संपूर्ण सहभाग आहे. तो पुढंही कायम राहील, असंही पेस्कोव्ह यांनी म्हटलं. गेल्या वर्षी G20 नेत्यांच्या मंचावर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी रशियन शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं होतं. 2020 आणि 2021 मध्ये पुतिन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे G20 शिखर परिषदेत सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.