सोन्या -चांदीच्या भाव वाढीने गाठला मार्च महिन्यातील उच्चांक !

0

सोन्याच्या दरात ३ हजार तर चांदीच्या दरात अडीच हजारांची वाढ

आनंद गोरे / लोकशाही न्यूज नेटवर्क

सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या काही महिन्यापासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजापेठेत सोन्याच्या गुंतवणूकीत वाढ होत असल्यामुळे सोन्याचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत.

दहा दिवसांपूर्वी सोन्याचे दर प्रतितोळा ५५ हजार ८१० रुपयांच्या घरात होते. तेच दर आता दहा दिवसांनी २ हजार रुपयांनी वाढून आज जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने प्रतितोळा ५७ हजार ८४० इतके दुपारी १ वाजेपर्यंत होते. काल सोमवार १३ रोजी सोन्याच्या दरात १४८० रुपयांची भरघोस वाढ होऊन मार्च महिन्यातील ५७ हजार ७२० रुपयांची उच्चतम पातळी गाठली होती. आज १४ मार्च मंगळवार रोजी सोन्याच्या दरात २० रुपयांची वाढ दिसून आली. दरम्यान सोन्याच्या दरात वाढ अशीच राहिल्यास सोने ६० हजारांची पातळी गाठू शकेल असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

 

चांदी प्रतिकिलो २ हजार ७०० रुपयांनी वाढली !

एककीकडे सोन्याच्या दरात वाढ होत असतांना चांदी कशी मागे राहील? जळगावच्या सुवर्णबाजारात गेल्या १० दिवसांत चांदी प्रतिकिलो २ हजार ७०० रुपयांनी वाढली असल्याचे चित्र आज १४ मार्च मंगळवार रोजी दिसून आले.काल सोमवार १३ रोजी चांदी प्रति किलो ६६ हजार ५८० रुपये दर होता. यात आज १३० रुपयांची वाढ होऊन चांदी प्रतिकिलो ६६ हजार ७१० रुपये इतका दर मिळाला. चांदीलाही गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. त्यामुळे चांदीलाही चांगली मागणी वाढली आहे.

जळगाव : सोन्याचा आजचा दर

14 मार्च 2023 ₹57,740 + 20.00

तारीख            किंमत      दर चढ -उतार

13 मार्च 2023 ₹57,720 ₹+1,480.00
12 मार्च 2023 ₹56,240 ₹+0.00
11 मार्च 2023 ₹56,240 ₹+10.00
10 मार्च 2023 ₹56,230 ₹+800.00
09 मार्च 2023 ₹55,430 ₹+470.00
08 मार्च 2023 ₹54,960 ₹-140.00
07 मार्च 2023 ₹55,100 ₹-750.00
06 मार्च 2023 ₹55,850 ₹+30.00
05 मार्च 2023 ₹55,820 ₹+10.00
04 मार्च 2023 ₹55,810 ₹+0.00

जळगाव सोन्याचा दर – मार्च : सर्वाधिक किंमत ₹57,720
जळगाव सोन्याचा दर – मार्च : सर्वात कमी किंमत ₹54,960
जळगाव सोन्याचा दर – मार्च : सरासरी किंमत ₹55,916
जळगाव सोन्याचा दर – मार्च : उघडणे किंमत (01 मार्च) ₹55,890
जळगाव सोन्याचा दर – मार्च : बंद किंमत (13 मार्च) ₹57,720

जळगाव : चांदीचा आजचा दर

14 मार्च 2023 ₹66,710 +130.00

 

तारीख        किंमत                     दर चढ उतार
13 मार्च 2023 ₹66,580      ₹+3,750.00
12 मार्च 2023 ₹62,830     ₹+10.00
11 मार्च 2023 ₹62,820     ₹+0.00
10 मार्च 2023 ₹62,820     ₹+870.00
09 मार्च 2023 ₹61,950      ₹+100.00
08 मार्च 2023 ₹61,850     ₹-310.00
07 मार्च 2023 ₹62,160      ₹-2,110.00
06 मार्च 2023 ₹64,270       ₹-80.00
05 मार्च 2023 ₹64,350       ₹+0.00
04 मार्च 2023 ₹64,350       ₹+10.00
06 मार्च 2023 ₹55,850       ₹+30.00
05 मार्च 2023 ₹55,820       ₹+10.00
04 मार्च 2023 ₹55,810       ₹+0.00

जळगाव चांदीचा दर – मार्च : सर्वाधिक किंमत ₹66,580
जळगाव चांदीचा दर – मार्च : सर्वात कमी किंमत ₹61,850
जळगाव चांदीचा दर – मार्च : सरासरी किंमत ₹63,597
जळगाव चांदीचा दर – मार्च : उघडणे किंमत (01 मार्च ) ₹64,450
जळगाव चांदीचा दर – मार्च : बंद किंमत (13 मार्च) ₹66,580

 

Leave A Reply

Your email address will not be published.