विश्व रूहानी केंद्र चोपडा शाखेतर्फे मनोरुगण गरजुंना मदत…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

चोपडा तालुक्यातील वेले येथील मानव सेवा तीर्थ बेवारस मनोरुग्णांना तीर्थात आणून त्यांची सेवा करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मनोरुग्णांना मानव सेवा तिर्थात आनून त्यांची सर्व प्रकाराची सेवा करण्यात आली. विश्व मानव रूहाणी केन्द्र नवानगर शाखा चोपडा हि नोंदणीकृत संस्था असून, संत बलजीत सिंघजी महाराज यांच्या नैतिक जीवन अध्याम् आणि ध्यान धारणा यावर आधारीत लोक कल्याणकारी समाजीक कार्याचे आयोजन करत असते.

विश्व मानव रूहाणी केन्द्र शाखा अमळनेर व चोपडा जिल्हा जळगांव तर्फे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी चोपडा नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत निकम गट नेते जिवन चौधरी निवृत्त पोलिस निरीक्षक मुंबई तसेच एस.एन.टी सदस्य युवराज चौधरी, रविद्र बोरसे यांच्या हस्ते ब्लॅंकेट, स्वटेर, गहु, तांदुळ, तुरदाळ असे अनेक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विश्व मानव रूहाणी केन्द्र शाखा चोपडाचे सर्व सदस्य प्रबंधक उपस्थित होते. मानव सेवा तिर्थचे वेले (चोपडा) एन आर पाटील संचालक यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.