माहेजी ते म्हसावद दरम्यान रेल्वेखाली सापडुन बिहार येथील इसमाचा मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडुन पटना (बिहार) येथील एका ३६ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पाचोरा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि.मी.खंबा क्रं. ३८९/२५ नजीक धावत्या रेल्वेखाली सापडुन रामा जोगेंद्र पंडित (३६) रा. अजनोरा, ता. नुरसराय, जि. नालंदा (बिहार) या इसमाचा ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान मयत रामा पंडित यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिल्यानंतर नातेवाईक पाचोरा येथे दाखल होवुन रामा पंडित यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल सचिन पवार हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.