विरावली शिवारात विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

0

यावल;- तालुक्यातील विरावली शिवारात असणाऱ्या एका विहिरीत 26 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की विरावली शिवारात असणारे शेत गट क्रमांक 175 मध्ये गणेश प्रकाश सपकाळे वय 26 राहणार विठ्ठलवाडी यावल याचा विहिरीत मृतदेह आढळून आला होता . त्याचे काका दीपक सपकाळे भाऊ श्रीकृष्ण सपकाळे यांनी ओळख पटवून तो गणेश सपकाळे याचा असल्याचे सांगितले. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास किशोर परदेशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.