ताडे येथे वृद्धाने घेतला गळफास

0

एरंडोल :-तालुक्यातील ताडे येथे एका 62 वर्षीय वृद्धाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला.

दिलीप चिंध्या पाटील असे मयत व्यक्तीचे नाव असून ५ ऑगस्ट रोजी दिलीप पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांना नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याबाबत डॉक्टरांनी दिलेला खबरीवरून कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस हेडक्वार्टेबल नितीन सूर्यवंशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.