काका मयत झाल्याचे सांगून चिमुकल्यासोबत विवाहिता बेपत्ता

0

चाळीसगाव ;- तालुक्यातील अलवाडी येथे काका मयत झाल्याचे सांगून एक विवाहिता तिच्या तीन वर्षीय मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्यावरन मेहुनबारे पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आले आहे .

याबाबत माहिती अशी की, कलवाडी येथील रहिवासी संदीप संतोष पाटील वय 42 हे शेतकरी असून त्यांची पत्नी माधवी संदीप पाटील आणि मुलगा नक्ष संदीप पाटील वय ३ याला सोबत घेऊन माझे काका वारले असे सांगून 22 जुलै 2023 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निघून गेली . तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने संदीप पाटील यांनी  मेहूनबारे पोलीस स्टेशनला धाव घेऊन पत्नी आणि मुलगा हरवल्याची फिर्याद दाखल केली. याबाबत पुढील तपास  फौजदार मिलिंद शिंदे करीत आहे. .

Leave A Reply

Your email address will not be published.