क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विनेश फोगटने आता मोठा निर्णय घेतला आहे. विनेश फोगटने मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.
https://twitter.com/Phogat_Vinesh/status/1739640335356358746?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1739640335356358746%7Ctwgr%5E1062b58e934d6dbc103a69caf26e4eae6b2eb6fe%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fsports%2Fother-sports%2Fvinesh-phogat-return-major-dhyan-chand-khel-ratna-and-arjun-award-indian-wrestler-2023-12-26-1011307
यापूर्वी ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीय संजय सिंह यांची WFI चे प्रमुख म्हणून निवड झाली होती. यानंतर ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने निवृत्ती घेतली आणि बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केला. त्यानंतर सरकारने कारवाई करत WFI ची नवीन संस्था निलंबित केली. यानंतर भारतीय कुस्ती संघटनेचे नवे अध्यक्ष संजय सिंग आणि त्यांच्या संपूर्ण टीमलाही निलंबित करण्यात आले. मात्र आता विनेश फोगटने मोठे पाऊल उचलले आहे.