बापानेच केला १३ वर्षीय मुलीचा विनयभंग

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सख्ख्या बापानेच विनयभंग केल्याचा प्रकार जळगाव तालुक्यात उघड झाला असून याप्रकरणी मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई व वडीलराहत असून सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पवयीन मुलीचे वडील घरी आले असता ती मुलगी घरात अभ्यास करीत असतांना तिच्या वडीलांनी तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर आईने घरात धाव घेवून मुलीला सोडविले. त्यानंतर पिडीतेसह तिच्या आईने एमआयडीसी पोलीस स्टेशनला नराधम बापाविरोधात तक्रार दिली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.