Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धावत्या रेल्वेखाली आल्याने युवक दगावला !
    गुन्हे वार्ता

    धावत्या रेल्वेखाली आल्याने युवक दगावला !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 15, 2023Updated:February 15, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

    धावत्या रेल्वेखाली आल्याने दिनकर नगरातील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नारायण शरद पवार (वय-२६) रा. दिनकर नगर, जळगाव असे मृत युवकाचे नाव आहे.

    नारायण पवार हा आई-वडील आणि बहीण यांच्यासह राहत होता. . गेल्या तीन महिन्यांपासून तो नाशिक येथील मेडिकल दुकानावर नोकरीला होता. दोन दिवसापूर्वीच तो जळगाव शहरात आई-वडील व बहिणीला भेटण्यासाठी आलेला होता. मंगळवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रात्री ८ वाजता चौकातून जाऊन येतो असे आईला सांगून घराबाहे पडला. त्यानंतर तो रात्री घरी आला नाही. दरम्यान रात्री १० वाजेच्या सुमारास जळगाव-आसोदा दरम्यानच्या रेल्वे रुळावर अपलाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४२२-१६ रेल्वे रूळ क्रॉस करत असतांना धावत्या रेल्वेखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर खिश्यातील कागदपत्रांच्या आधारे मयताची ओळख पटली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद गंगावणे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. खाजगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. बुधवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई अनिता, बहीण पूनम आणि वडील शरद रामदास पवार असा परिवार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon Shanipeth Police Station
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif