घरात घुसून अश्लिल कृत्य करत महिलेचा विनयभंग

0

जळगाव : महिला घरात एकटी असतांना तिच्या

घरात घुसून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करीत विनयभंग केल्याची घटना सोमवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कमलाकर साहेबराव अहिरे (वय ३७, रा. राजमालतीनगर) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका परिसरात २२ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ११ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास महिला एकटी घरी असतांना संशयित कमलाकर साहेबराव अहिरे (वय-३७) रा. राजमालती नगर हा महिलेच्या घरात शिरला. त्याने महिलेशी अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित कमलाकर साहेबराव अहिरे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वीरेंद्र शिंदे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.