धुळ्यात गुंगीकारक औषधांचा बेकायदेशीर साठा जप्त

0

धुळे : शहरात राहणाऱ्या चार जणांना पकडून त्याच्याकडून गुंगीकारक औषधांचा बेकायदेशीर साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला. यात ५८० बाटल्या, ३४० गोळ्यांचे स्ट्रिप असा १ लाख ३ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई मंगळवारी सकाळी केल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दंडेवाला बाबा नगरात छापा टाकला. विकास उर्फ विक्की मोहन चौधरी (वय ३६) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २६ हजार रुपयाच्या १७० गुंगीकारक औषधांच्या १७० बाटल्या, ५ हजार १२० रुपयांच्या १६० स्ट्रिप असा मुद्देमाल जप्त केला. त्याच्या चौकशीतून लुकेश अरुण चौधरी (वय ३०, रा. देवपूर) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले.

त्यावरून लुकेश चौधरी याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अशाच प्रकारचा गुंगीकारक माल अवैधरीत्या प्रमोद अरुण येवले (वय ३४) याच्याकडे असल्याचे सांगितले. पथकाने प्रमोद येवले याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या राहत्या घरातून ३६ हजार ७५० रुपयांच्या गुंगीकारक औषधांच्या २१० बाटल्या जप्त केल्या. त्याने वाडीभोकर येथील मुकेश आनंदा पाटील (वय ३५) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने त्याच्या राहत्या घरातून ३० हजाराच्या २०० औषधांच्या बाटल्या, ५ हजार ७६० रुपयांच्या १८० गोळ्यांच्या स्ट्रिप हस्तगत केल्या. चौघांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.