दिशा मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन

0

मुंबई : चित्रपटसृष्टीतील टॅलेंट मॅनेजर, तसेच दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास

अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्याकडे नेतृत्वाखाली

पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. उत्तर विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वाखाली हे तपास पथक काम करणार आहे.

दिशा सालियन (२८) हिचा कोविड महासाथीच्या काळात, ८ जून २०२० रोजी मृत्यू झाला. मालाड येथील गॅलेक्सी रिजेंट इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून खाली पडल्याने ती मरण पावली. दिशा सालियन ही हिंदी चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मैत्रीणही होती.

Leave A Reply

Your email address will not be published.