मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती

0

नागपूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागेवर नागपूरमधील निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर याआधीच आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. आता अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळातून विविध तर्क लावले जात असतानाच मंगळवारी राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना करण्यात आली.

त्यानुसार आयोगाच्या सदस्यपदी ओमप्रकाश जाधव, मारूती शिंगारे आणि मच्छिंद्रनाथ तांबे यांचीनियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजीच सरकारकडे राजीनामा पाठवला. त्यानंतर सरकारने ९ डिसेंबर रोजी तो स्वीकारला; पण ते जाहीर करण्यात आले नव्हते. मंगळवारी सकाळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून ही माहिती समोर आणली

Leave A Reply

Your email address will not be published.