जळगावात युवतीचा गाल ओढून विनयभंग

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील एका परिसरात युवतीचा गाल ओढून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पीडिता हि शहरातील एका भागात राहत असून नवीपेठ परिसरात एकाने तिचा हात धरून नंतर गाल ओढून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार ५ एप्रिल रोजी दुपारी घडला. या घटने प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला समीर नाव गाव पूर्ण माहीत नाही ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उप अधिक्षक संदीप गावीत तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.