देशात कोरोना वाढ, मंगळवारी आढळले 4,435 रुग्ण

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

बुधवारी (wednesday), केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात 4,435 लोकांना कोरोनाच लागण झाली आहे. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांच्या चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. 163 दिवसांनंतर एका दिवसात चार हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळमध्ये (Kerala) प्रत्येकी चार आणि छत्तीसगड (Chhattisgarh), दिल्ली (Delhi), गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. संसर्गामुळे आतापर्यंत एकूण पाच लाख 30 हजार 916 मृत्यू झाले आहेत. आत्तापर्यंत देशातील कोरोना रुग्णांची संख्या 23,091 वर पोहचली आहे. भारतात सध्या कोरोना व्हायरससोबतच H3N2 चा संसर्गही वाढताना दिसत आहे. वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.