पोलिस अधिक्षकांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांना दालनातील एसी काढण्याचे आदेश

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर (Dr. B.G. Shekhar) यांनी परवानगी व अधिकार नसतांना पोलिस अधिक्षकांसह इतर अधिका-यांनी आपल्या दालनात बसवलेले एअर कंडीशनर काढण्यात यावे असे पत्र जळगाव पोलिस (Jalgaon Police) अधिक्षकांच्या नावे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जळगावच्या असह्य उन्हाळ्यात पोलीस दलातील अधिकाऱ्यांना घामाघूम करणारा आदेश निघाल्याची चर्चा आता जिल्ह्यात होत आहे.

माहिती अधिकार कार्यकरेते दिपककुमार गुप्ता यांनी माहिती अधिकारातून प्राप्त माहिती मिळविली असता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या मोठ्या अधिकाऱ्यांसह कोणालाही एअर कंडिशनर आपल्या दालनात वापरण्याची परवानगी वा अधिकार नाही.

दीपककुमार गुप्ता यांचा केलेला पाठपुरावा लक्षात घेत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांनी जळगाव पोलिस अधिक्षकांच्या नावे एक पत्र पाठवले असून जळगावसह धुळे, नगर, नाशिक ग्रामीण आदी पोलिस अधिक्षकांना देखील कळवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.