विधानसभा अधिवेशनाची तारीख बदलली

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. अधिवेशनात बहुमत चाचणी घेऊन सरकार आपले बहुमत सिद्ध करेल. यासाठी आयोजित विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. विधानसभेचे विशेष अधिवेशन 2 व 3 जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र, आता विधानसभेच्या या अधिवेशनाची तारीख बदलली आहे.

विधानसभेचे विशेष अधिवेशन एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावले आहे. दरम्यान, अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.