वडीलांच्या अस्थींना नदीत विसर्जित न करता महाले परिवाराचा अभिनव उपक्रम… 

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगर येथील रहिवासी सुरेश महाले यांचे वडील देवराम केशव महाले यांचे अल्पशा आजाराने दि १० जुन शनिवार रोजी निधन झाले होते. त्यांच्या अस्थी व राख नदी मध्ये विसर्जन न करता रावेर तालुक्यातील निभोंरा गावी त्यांच्या शेतात पिंपळ, उंबर, वड, निंबाचे वृक्ष लावत अस्थी व राख झाडांखाली विसर्जित करण्यात आली. नदीमध्ये अस्थी टाकून नदी प्रदूषित न करता मृत्युनंतर सुद्धा आपल्या वडीलांच्या देहाच्या अस्थी पासुन वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण व्हावे असा उद्देश ठेवुन महाले परिवाराने हा अभिनव उपक्रम अंमलात आणला. तसेच दरवर्षी पुण्यस्मरणाच्या दिनी एक वृक्ष लावण्यात येणार असल्याचा संकल्प महाले परिवारने केला आहे. या उपक्रमाबाबत सर्वत्र चर्चा सुरु असुन महाले परिवाराच्या या निर्णयाचे समर्थन केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.