तळवेल येथे तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

0

वरणगाव;-  भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील तरुण शेतकरी शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा पंप सुरु करताना विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि १९ रोजी घडली

या बाबत माहिती अशी की तालुक्यातील तळवेल येथील निलेश (उर्फ ) सोपान गोपळ पाटील (४६ ) हे आपल्या शेतात मंगळवारच्या पाहटे आठ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील कांदा पिकाला पाणी देण्यासाठी विज पंप सुरु करीत असताना विजेचा जबर धक्का बसला त्यात ते खाली जमीनीवर कोसळून बेशुद्ध अवस्थेत पडलेल होते शेजारच्या शेतातील शेतकऱ्याच्या लक्षात येता त्यांना तातकाळ भुसावळ येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यावेळी मात्र डॉक्टरानी तपासून त्यांना मृत्य घोषीत केले
याबाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशनला शुन्य क्रमांकाने दाखल करण्यात येऊन वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मत मुत्यूची नोंद करण्यात आली आहे

मयत सोपान पाटील हे विहिरीच्या पंपाचे दुरुस्तीचे काम करून शेती करायाचे त्यांच्या पश्चात आई , पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्यावर तळवेल येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.