वरणगांव फॅक्टरी कर्मचाऱ्याचा लवकी नाल्यात बुडून मृत्यू

0

वरणगांव : आयुध निर्माणी वरणगाव मधील कर्मचारी सुरक्षा रक्षक (दरबान ) शुभम बबलू तायडे (वय २३) याचा वरणगांव व फॅक्टरी रोडवर असलेल्या लवकी नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडल्याने वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

शुभम बबलू तायडे हा फॅक्टरी मध्ये दरबान पदावर नोकरीवर असून तो आनंद नगर भुसावळ मध्ये राहतो सकाळी सात वाजता तो ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघाला असता लवकीच्या नाल्याला पूर असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात तो पडला असावा असा पोलिसांचा कयास आहे. वरणगाव येथील मयूर जावळे याचा दूरध्वनी द्वारे इंटकचे महासचिव महेश पाटील यांना कळवले की लवकी नाल्यात फॅक्टरीचे स्टिकर लावलेली मोटरसायकल क्रमांक एमएच १९डी आर ४०४६ पडलेली आहे. त्यावेळी महेश पाटील यांनी समक्ष जाऊन बघितले असता सदरची मोटरसायकल ही शुभम तायडे ची असल्याचे त्यांच्या लक्षात आले 1. नाल्याच्या किनाऱ्यावर १०० मीटर अंतरावर शोध घेतल्यानंतर शुभम तायडे हा झाड झुडपांमध्ये मयत अवस्थेत आढळून आला आहे. यावेळी महेश पाटील यांनी वरणगांव पोलीस स्टेशनला खबर दिली वरणगाव पोलीस स्टेशनचे स्टाफ त्या ठिकाणी पोहचले. अधिक तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.