वरणगावात एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोडी

0

 

वरणगाव;- शहरातील रेणूका नगर व फुलगाव येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यानी तब्बल आठ ठिकाणी बंद घराचे कुलूप कट्टरने तोडून धुमाकूळ घातला होता. त्या पैकी फक्त दोघांच्या घरातील रोख रक्कमसह एैशी हजाराचा ऐवज लंपास केला असल्याचे उघडकीस आले.

या बाबत पोलीसांच्या माहीती नुसार असे की शनिवारच्या रात्री अज्ञात चोरानी शहरातील रेणुका नगर मधील बंद घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची नासधुस केली मात्र घरातील किती रक्कम किंवा ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नाही तर त्याच रात्री फुलगावलाही पाच ठिकाणी अशाच प्रकारे कुडूप तोडून घरात धुडघुस घालून दिपक गंगाधर पाटील यांच्या घरातील लोंखडी पेटीचे व , कपाटाचे कुलूप तोडून त्यातील पाच हजार रोख तीस ग्रॅम सोन्याचे पुष्पहार व नेकलेस , चांदीचे जोडवे व पैजन , साकळी असे सत्तर हजार रुपयाचा ऐवज लाबविला. तर हेंमत सुभाष चौधरी यांच्या घरातील कपाटात ठेवलेल्या पर्स मधील दहा हजार रुपये रोख रक्कम पळविली .

या बाबत वरील दोघाच्या खबरीनुसार वरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.