अभिनेता किंग खानच्या जवान चित्रपटाने मोडले विक्रम ; केली इतकी कमाई

0

मुंबई ;- अभिनेता शाहरुख खान पुन्हा बॉक्स ऑफिसचा ‘किंग’ ठरला आहे. ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि सिनेमाने फक्त चार दिवसांमध्ये सर्व सिनेमांचा रेकॉर्ड मोडला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिवार – रविवार असल्याचा सिनेमाला मोठा फायदा झाला. सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ‘जवान’ सिनेमाने अनेक हीट सिनेमांना मागे टाकलं आहे. सिनेमाच्या रविवारच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

‘जवान’ सिनेमाबद्दल असलेली क्रेझ सध्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा तुफान कमाई करताना दिसत आहे. पण चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत. रिपोर्टनुसार,’जवान’ सिनेमाने चोथ्या दिवशी तब्बल ८२ कोटी रुपयांचा कमाई केली आहे. चार दिवसांमध्ये रविवारी सिनेमाने सर्वात जास्त कमाई केली आहे.

‘जवान’ सिनेमाची कमाई

पहिला दिवस – ७५ कोटी
दुसरा दिवस – ५३. २३ कोटी
तिसरा दिवस – ७७.८३ कोटी
चौथा दिलस- ८२ कोटी

‘जवान’ने भारतात धुमाकूळ घातला असून शाहरुखची क्रेझ जगभरात पाहायला मिळत आहे. अवघ्या तीन दिवसांत ‘जवान’ ४०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘जवान’ सिनेमाने आतापर्यंत जगभरात ३८४.६९ कोटींची कमाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.